Benefit Details
अ) पीडितांना जिल्हा / राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतिम मंजुरीनंतर खालिलप्रकारे अर्थसहाय्य मिळू शकेल. मिळणाऱ्या अर्थसहाय्यापैकी ७५% रक्कम पिडीत किंवा त्याच्या अल्पवयीन वारसाच्या नावे १० वर्षासाठी (पिडीत बालक असेल तर वयाच्या १८ वर्षापर्यंत) बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवली जाईल आणि उर्वरित २५% रकमेचा त्यांना धनादेश मिळेल.
१) बलात्कार विषयक घटनांमध्ये:
बलात्काराच्या घटनेच्या परिणाम स्वरूप मानसिक धक्क बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाला असेल तर – रु. १ लाख पर्यंत
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम- २००५ नुसार न्यायालयात/ फारकत / घटस्फोट झाल्यानंतर पतीकडून महिलेच्या बाबतीत बलात्काराची घटना घडल्यास- रु. १ लाखापर्यंत
बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास ती महिला कमावत्या कुटुंबातील नसल्यास रु. १ लाखापर्यंत आणि असल्यास रु. २ लाखापर्यंत.
२) पॉस्को अंतर्गत बालकांवर लैंगिक अत्याचार विषयक घटनांमध्ये:
• घटनेमध्ये पिडीत बालकास / अल्पवयीन मुलीस मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
• भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात – रु. १ लाख पर्यंत.
३) अॅसिड हल्ला:
• घटनेमध्ये पीडित महिला / बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास, शरीराच्या दृश्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास- रु. १० लाखापर्यंत
• अॅसिड हल्ल्यात जखमी झाल्यास- रु. ३ लाखापर्यंत
ब) बलात्काराच्या घटनेमुळे गंभीर इजा / आजार अथवा HIV लागण झाली असेल तर त्यासाठी संबंधितास शासकीय रुग्णालयातून मोफत उपचार दिले जातील.
क) अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास करावयाच्या प्लास्टिक सर्जरी शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात शासनाच्या खर्चाने होईल.
Online Application Link
उपलब्ध नाही