English मराठी
 • योजनेचे नाव: शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम- बळीराजा चेतना अभियान
योजनेचा उद्देश
नैसर्गिक आपत्‍तीमुळे आलेल्या नैराश्‍याने ग्रासलेल्‍या शेतक-यांना नैराश्‍यातून बाहेर काढणे, त्‍यांचे मनोबल उंचावणे, त्‍यांच्‍यामध्‍ये जगण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास निर्माण करणे.
पात्रतेचा तपशील
 • शेतकरी असावा
 • यवतमाळ किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असावा
 • त्रस्त कुटुंबाची ग्रामस्तरीय समिती मार्फत सर्वेक्षण करून यादी बनविली जाईल त्यामध्ये नाव असावे
लाभाचा तपशील
नापीकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटाने त्रस्त कुटुंबाना त्यामधून बाहेर काढण्यासाठी खालील प्रकारे सहाय्य केलेलं जाईल.
 • शेतीविषयक शासकीय योजना, कमी खर्चाची कोरडवाहू शेती, सामुहिक विवाहाचे महत्व, व्यसनमुक्ती इत्यादी बाबतची माहिती भजन,कीर्तन,पथनाट्याच्या माध्यमातून गावात येऊन दिली जाईल
 • गावातील लोकांच्या सहभागातून पेरणीसाठी सहाय्य केले जाईल
 • मानसोपचार तज्ञ, समाजसेवक यांच्या मदतीने तुमच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था केली जाईल
 • जिल्ह्यातील डॉक्टरांच्या मदतीने आपल्यासाठी विविध स्वास्थ्य शिबिरे आयोजित केली जातील
 • पात्र कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना, अन्नसुरक्षा योजना इत्यादी मिळणाऱ्या लाभाची खात्री केली जाईल
 • आधुनिक पद्धतीने कमी पाण्यात आणि कमी खर्चात शेती करण्यासाठी शेतीचे कार्यक्रम आयोजित केले जातील
 • शेतकरी सहकारी सोसायटीचे तुम्ही सभासद व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील.
 • आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ चा उतारा
 • नमुना ८ अ
 • संपर्क
  बळीराजा चेतना अभियान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
  ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
  उपलब्ध नाही