English मराठी
योजनेचा उद्देश
बलात्कार / बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनासाठी मदत करणे
पात्रतेचा तपशील
 • स्वत: चे बँक खाते असावे
 • पीडित असल्यास पीडिताच्या बाबतीत घडलेल्या घटनांमध्ये खालील प्रमाणे गुन्ह्यांची नोंद (FIR) झालेली असावी
 • अ) बलात्कार : भा.दं.वि. कलम ३७५ व ३७६, ३७६(२), ३७६(अ) व ३७६(ब) प्रमाणे
  ब) बालकांवरील लैंगिक अत्याचार : Protection of Children from Sexual Offences Act, २०१२ कलम ३, ४, ५ व ६ प्रमाणे व
  क) ॲसिड हल्ला : भा.दं.वि. कलम ३२६(अ) ते ३२६(ब) प्रमाणे
 • वरील नमूद तीनही बाबींसाठी पीडिताला याअगोदर पीडीत भरपाई योजने अंतर्गत अर्थसहाय्य केले गेलेले नसावे
लाभाचा तपशील
अ) पीडितांना जिल्हा / राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतिम मंजुरीनंतर खालिलप्रकारे अर्थसहाय्य मिळू शकेल. मिळणाऱ्या अर्थसहाय्यापैकी ७५% रक्कम पीडित किंवा त्याच्या अल्पवयीन वारसाच्या नावे १० वर्षासाठी (पीडित बालक असेल तर वयाच्या १८ वर्षापर्यंत) बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवली जाईल आणि उर्वरित २५% रकमेचा त्यांना धनादेश मिळेल.
१) बलात्कार विषयक घटनांमध्ये:
 • बलात्काराच्या घटनेच्या परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
 • भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाला असेल तर – रु. १ लाख पर्यंत
 • कौटुंबिक हिंसाचार अधिनियम- २००५ नुसार न्यायालयात/ फारकत / घटस्फोट झाल्यानंतर पतीकडून महिलेच्या बाबतीत बलात्काराची घटना घडल्यास- रु. १ लाखापर्यंत
 • बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास ती महिला कमावत्या कुटुंबातील नसल्यास रु. १ लाखापर्यंत आणि असल्यास रु. २ लाखापर्यंत.
 • २) पॉक्सो अंतर्गत बालकांवर लैंगिक अत्याचार विषयक घटनांमध्ये:
  • घटनेमध्ये पीडित बालकास / अल्पवयीन मुलीस मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
  • भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात – रु. १ लाख पर्यंत.
  ३) ॲसिड हल्ला:
  • घटनेमध्ये पीडित महिला / बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास, शरीराच्या दृश्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास- रु. १० लाखापर्यंत
  • ॲसिड हल्ल्यात जखमी झाल्यास- रु. ३ लाखापर्यंत

  ब) बलात्काराच्या घटनेमुळे गंभीर इजा / आजार अथवा HIV लागण झाली असेल तर त्यासाठी संबंधितास शासकीय रुग्णालयातून मोफत उपचार दिले जातील.

  क) ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास करावयाच्या प्लास्टिक सर्जरी शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात शासनाच्या खर्चाने होईल.
  आवश्यक कागदपत्रे
  सध्या तपशील उपलब्ध नाही
  संपर्क
  जिल्हा गुन्हेगारी क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय.
  ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
  उपलब्ध नाही