English मराठी
 • योजनेचे नाव: बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतक-यांच्‍या मृत जनावरांकरीता मदत
योजनेचा उद्देश
नैसर्गिक आपत्‍तीमुळे दगावणाऱ्या मृत जनावरांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
पात्रतेचा तपशील
 • ज्‍या शेतकरी कुटुंबातील जनावरे दगावली आहेत त्‍या कुटुंबाची उपजीविका निव्‍वळ शेतीवर अवलंबून असावी.
 • कुटुंबातील सदस्‍य शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा.
 • त्‍या कुटुंबाचे वार्षीक उत्‍पन्‍न १ लाखाच्‍या वर नसावे.
 • प्रत्‍येक कुटुंबाकरीता प्रती जनावर २ (दोन) या मर्यादेत मदत दिली जाईल, दोन जनावरांच्‍या वर मदत देय असणार नाही.
लाभाचा तपशील
पीकांचे फुटवे खावून, अन्‍नधान्‍य खावून फुगून ज्यांची जनावरे दगावलेली आहेत आणि ज्यांना शासनाच्‍या नैसर्गिक आपत्‍ती विभागामार्फत मदत मिळत नाही, अशा शेतक-यांच्‍या दुभती गाय, म्‍हैस या जनावरांना प्रती जनावर जास्तीत जास्त रु. १०,०००/- (दहा हजार रुपये) पर्यंत व भाकड गाय, म्‍हैस व बैल यांना प्रती जनावर जास्तीत जास्त रु. ५०००/- (पाच हजार) पर्यंत आर्थिक मदत मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
 • ७/१२ चा उतारा
 • नमुना ८ अ
 • मृत जनावराचा शव विच्‍छेदन अहवाल
 • उत्पन्नाचा दाखला
 • बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत स्‍थापीत झालेल्‍या ग्रामस्‍तरीय समितीचा अहवाल, तसेच इतर आवश्‍यक कागदपत्र
 • संपर्क
  तहसीलदार अथवा बळीराजा चेतना अभियान कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ, काही अडचण आल्यास १८००२३३६३६० निशुल्क क्रमांकावर फोन करावा.
  ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
  उपलब्ध नाही